EK DON ADHICH – Review

EK DON ADHICH was originally a one act play which won the viewer's choice award at Mrugajal Marathi Inter-collegiate competition. It was then extended to an hour and ten minutes for the More »

रिव्ह्यू : मी रेवती देशपांडे

निर्मात्या लता नावेर्कर यांना अधूनमधून वेगळे विषय रंगभूमीवर आणण्यात रस असतो. त्यानुसार त्यां More »

रिव्ह्यूः प्रेमा तुझा रंग कसा?

'प्रेमा तुझा रंग कसा?' हे नाटक कोणत्याही काळात लोकप्रिय व्हावे,असेच आहे. त्याच्यातला नाटककार वसं... More »

Play Review – Mi Revati Deshpande

Exclusive review of Marathi Natak, Play. It brought together two stalwarts of Marathi entertainment industry- Mr. Mohan Joshi and Mr Ramesh Bhatkar together after almost 30 long years.. More »

Adhe Adhure – Review

It doesn't happen often that a play written and performed over 40 years ago still appears ahead of its times. Watching writer and playwright Mohan Rakesh's classic play AADHE ADHURE, resurrected by More »

Lav hatheli Shyam lakhi Dau – Preview

Many plays about Radha and Krishna focus on Krishna alone. But this play brings their love story centre stage through Radha's perspective. Her eternal love for Krishna is highlighted in a unique wa...

Varyavarchi Varat – Preview

This play is a revival of the original production which was launched 50 years ago on September 16, 1962. Then it starred the famous Marathi litterateur and actor Pu La as the city-dwelling protagoni...

Bombay Talkies – Preview

A series of characters are strung together with humour, pathos and sattire as they come face-to-face with the reality of living in India's Maximum City. ...

१३ वी ‘कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा’

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा , श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित १३ वी कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा दि. ३ ते ६ मार्च दरम्यान चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहेत. एकूण ४२ संघांपैकी ३० संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे. यास्पर्धेत कल्याण, ठाणे, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर ,नासिक रोड, पुणे येथून ३० संघानी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत पहिल्या ३ व उत्तेजनार्थ २ एकांकिकांना पारितोषिके देण्यात येतील. रोख रु. १००० ,५००१, ३००१ व १५० अशी व सन्मान चिन्हे असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. शिवाय पुरुष व स्त्री अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत योजना, प्रकाश योजना, बाल कलाकार इ. वैयक्तिक रोख रक्कम व सन्मान चिन्हे अशी पारितोषिकेही दिली जातील.

स्पर्धेचा शुभारंभ परंपरेप्रमाणे सुरुवातीच्या एकांकिकांमधील पडद्यामागील कलाकारांचे हस्ते शनिवार दि. ३ मार्च २०१२ रोजी रात्री ९ वाजता होणार असून स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. ६ मार्च २०१२ रोजी रात्री ९.३० वाजता होणार आहे. स्पर्धा बघण्यासाठी प्रत्येक दिवसासाठी रु. ५० ची तिकिटे प्रेक्षगृहाव त्या त्या दिवशी उपलब्ध असतील. स्पर्धेचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त रंगप्रेमींनी घ्यावा , असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब भोईर व उपाध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल यांनी केले आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती साठी किरण येवलेकर ( ९०२८०५६८५८), नरेंद्र आमले ( ९८२२५५४०८६), सुहास जोशी ( ९८२२२४४३०८), राजेंद्र बंग (९८२२३१३०६६) व गौरी लोंढे (९९२३६८०८१९) यांच्याशी संपर्क साधावा. सोबत स्पर्धेचे वेळापत्रक दिले आहे.

Sakharam Binder – Preview

SAKHARAM BINDER is Tendulkar's most intensely naturalistic play. Banned in India after its 1974 premiere, The Bombay High Court, however, in a vindication of the right of free expression, struck d...

अस्तित्व आयोजित पारंगत सन्मान २०१२ – गौरव एकांकिकांचा

एकांकिका कलावंतांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा गौरव
स्पर्धेपलीकडचा, तरुणाईचा एकत्रित कलाविष्कार. निमित्त पुरस्कारांचे, स्पर्धेशिवाय एकत्र येण्याचे

मराठी एकांकिका क्षेत्रातील गुणवत्तेचा सन्मान करणारा “पारंगत सन्मान” पुरस्कार ”अस्तित्व” मुंबई यांच्यातर्फे  देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सादर झालेल्या एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य व संगीत असे पुरस्कार खुल्या व महाविध्यालयीन अशा  दोन गटांत देण्यात येतील. एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून दरवर्षी मराठी रंगभूमीच्या  मुख्य  प्रवाहात  येउन  मिळणारी  रंगकर्मींची  मोठी  फळी हि मराठी रंगभूमीच्या जिवंतपणाचे, सळसळत्या उर्जेचे गमक आहे. नवा  प्रेक्षकवर्ग सातत्याने निर्माण  करणाऱ्या एकांकिका स्पर्धांचा माहौल हा वर्षानुवर्ष चर्चेचा विषय ठरतो.

अखंडपणे चालणाऱ्या ह्या स्पर्धा विश्वात  प्रत्येक स्पर्धेत चुरस ही असतेच,वर्षभरातल्या स्पर्धांनंतर सर्वोत्तम स्पर्धकांच्या ही स्पर्धा भरवल्या जातात. पण ह्या साऱ्यामध्ये “स्पर्धा” हा एकच घटक टोकाचा ठरत असल्यामुळे ह्या सृजनशील मंडळींमध्ये एक प्रकारचा दुरावा अनुभवायला मिळतो. “जिंकणाऱ्यांची  दिवाळी आणि आणि बाकी होळी” हे चित्र कुठेतरी बदलायला हवं आणि या एकांकिकांच्या वर्षभरातल्या कामगिरीचे मूल्यमापन व्हावे अशी गरज  अनेक ज्येष्ठ रंगकर्मींनी बोलून दाखवली होती.

हाच विचार डोळ्यासमोर ठेवून एकांकिका कलावंतांना कुठल्याही स्पर्धेशिवाय एकत्र आणून त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा गौरव करावा यासाठी “अस्तित्व”ने मागील तीन वर्षापासून “पारंगत एकांकिका सन्मान” संध्येचा प्रारंभ केला. मागच्या वर्षी मुंबई,पुणे,कोकण,औरंगाबाद,सांगली,नाशिक भागातल्या एकांकिका स्पर्धकांनी त्यात उत्स्फूर्तपणे  भाग घेतला तसेच प्रसारमाध्यमांनी  ह्या उपक्रमाला भरभरून दाद दिली. यंदा पारंगत सन्मान संध्येचे आयोजन शनिवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ प्रभादेवीच्या पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या  मिनी थिएटर मध्ये करण्यात आले आहे. या पारंगत सन्मान पुरस्कारासाठी दि. ०१ फेब्रुवारी २०११  ते ३१ जानेवारी २०१२ दरम्यान प्रथम पुरस्कारप्राप्त एकांकिका तसेच वैयक्तिक स्वरुपात पारितोषिकप्राप्त कलावंत आणि तंत्रज्ञ पात्र असतील. या पुरस्कारांचे प्रवेश अर्ज  www.astitva.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.

अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२१०४४८६२.
प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१२ आहे.
पुरस्कारांची  नामांकन २० फेब्रुवारी २०१२ रोजी  जाहीर होतील.

The National School of Drama’s Bharat Rang Mahotsav… Featuring 96 productions… – News

The National School of Drama ushers in the New Year by hosting the fourteenth edition of its annual national and international theatre festival, the Bharat Rang Mahotsav (BRM). The BRM this year will ...

वैचारिक भूमिकांचं चित्रप्रदर्शन

१९७९-ते १९८९ हे दशक बडोद्याच्या आर्टस्कूलसाठी क्रांतिकारक होतं. या दशकात या आर्टस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या चित्रकारांनी पुढे आपल्या कलाजाणिवांनी भारतीय कलेचं विश्व अधिक विस्तारित केलं. चित्रकलेकडे पाहायच्या पारंपरिक दृष्टिकोणाला या पिढीने छेद दिला.