Category Archives: Events

अस्तित्व आयोजित पारंगत सन्मान २०१२ – गौरव एकांकिकांचा

एकांकिका कलावंतांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा गौरव
स्पर्धेपलीकडचा, तरुणाईचा एकत्रित कलाविष्कार. निमित्त पुरस्कारांचे, स्पर्धेशिवाय एकत्र येण्याचे

मराठी एकांकिका क्षेत्रातील गुणवत्तेचा सन्मान करणारा “पारंगत सन्मान” पुरस्कार ”अस्तित्व” मुंबई यांच्यातर्फे  देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सादर झालेल्या एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य व संगीत असे पुरस्कार खुल्या व महाविध्यालयीन अशा  दोन गटांत देण्यात येतील. एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून दरवर्षी मराठी रंगभूमीच्या  मुख्य  प्रवाहात  येउन  मिळणारी  रंगकर्मींची  मोठी  फळी हि मराठी रंगभूमीच्या जिवंतपणाचे, सळसळत्या उर्जेचे गमक आहे. नवा  प्रेक्षकवर्ग सातत्याने निर्माण  करणाऱ्या एकांकिका स्पर्धांचा माहौल हा वर्षानुवर्ष चर्चेचा विषय ठरतो.

अखंडपणे चालणाऱ्या ह्या स्पर्धा विश्वात  प्रत्येक स्पर्धेत चुरस ही असतेच,वर्षभरातल्या स्पर्धांनंतर सर्वोत्तम स्पर्धकांच्या ही स्पर्धा भरवल्या जातात. पण ह्या साऱ्यामध्ये “स्पर्धा” हा एकच घटक टोकाचा ठरत असल्यामुळे ह्या सृजनशील मंडळींमध्ये एक प्रकारचा दुरावा अनुभवायला मिळतो. “जिंकणाऱ्यांची  दिवाळी आणि आणि बाकी होळी” हे चित्र कुठेतरी बदलायला हवं आणि या एकांकिकांच्या वर्षभरातल्या कामगिरीचे मूल्यमापन व्हावे अशी गरज  अनेक ज्येष्ठ रंगकर्मींनी बोलून दाखवली होती.

हाच विचार डोळ्यासमोर ठेवून एकांकिका कलावंतांना कुठल्याही स्पर्धेशिवाय एकत्र आणून त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा गौरव करावा यासाठी “अस्तित्व”ने मागील तीन वर्षापासून “पारंगत एकांकिका सन्मान” संध्येचा प्रारंभ केला. मागच्या वर्षी मुंबई,पुणे,कोकण,औरंगाबाद,सांगली,नाशिक भागातल्या एकांकिका स्पर्धकांनी त्यात उत्स्फूर्तपणे  भाग घेतला तसेच प्रसारमाध्यमांनी  ह्या उपक्रमाला भरभरून दाद दिली. यंदा पारंगत सन्मान संध्येचे आयोजन शनिवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ प्रभादेवीच्या पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या  मिनी थिएटर मध्ये करण्यात आले आहे. या पारंगत सन्मान पुरस्कारासाठी दि. ०१ फेब्रुवारी २०११  ते ३१ जानेवारी २०१२ दरम्यान प्रथम पुरस्कारप्राप्त एकांकिका तसेच वैयक्तिक स्वरुपात पारितोषिकप्राप्त कलावंत आणि तंत्रज्ञ पात्र असतील. या पुरस्कारांचे प्रवेश अर्ज  www.astitva.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.

अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२१०४४८६२.
प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१२ आहे.
पुरस्कारांची  नामांकन २० फेब्रुवारी २०१२ रोजी  जाहीर होतील.

The National School of Drama’s Bharat Rang Mahotsav… Featuring 96 productions… – News

The National School of Drama ushers in the New Year by hosting the fourteenth edition of its annual national and international theatre festival, the Bharat Rang Mahotsav (BRM). The BRM this year will ...

Awishkar’s 25th Arvind Deshpande Smruti Mahotsav…

It was the late Arvind Deshpande's dream to launch fresh experimental productions under his banner Awishkar. His associates launched a theatre festival in his memory to continue his creative mission. ...

MMW Awards Polpular 2012

Generally for popular awards, the names of the nominees for the awards are decided by the Judges appointed by the hosts and then the voting pattern is used to decide the winner in each category on popularity vote.

INT-Astitva-Sathaye College Presents Hindi One-Act Play Competition…

The Indian National Theatre (INT) has been organising the Inter Collegiate One - Act Play Competition in Marathi for the past 40 years. These have proved to be highly popular with college students in ...

Results of the 40th IPTA Mumbai’s Inter-Collegiate Drama Competition

The 40th year of The Indian People's Theatre Association, Mumbai (IPTA Mumbai's) ICDC- Inter-Collegiate Drama Competition had six city colleges, competing in the final round at Tejpal auditorium on Se...

नाट्योत्सव

नुकताच नेहरु सेंटरचा पंधरावा राष्ट्रीय नाट्योत्सव पार पडला. दरवर्षी या नाट्योत्सवात देशभरातील विविध भाषिक रंगकर्मी आपली कला पेश करतात. त्यामुळे भारतीय रंगभूमीचे एक समग्र दर्शन रसिकांना घडते...

विशेष मुलांसाठी नाट्यस्पर्धा

नवक्षितीज संस्थेतर्फे येत्या बारा ऑक्टोबर रोजी विशेष मुलांच्या नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १५ शाळांनी सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या हस्ते होणार आहे.